चिंटू

४:२३ म.उ. Kedar Bhope 0 Comments

चिंटू प्रथमच आपल्या आजोबासोबत गणपतीच्या मंदिरात गेला होता. मंदिरात शिरल्याबरोबर आजोबाने दारातली घंटा वाजवली. चिंटू बारकाईने आपले आजोबा काय काय करतात ते निरखून पाहत होता. नंतर आजोबा गणपति समोर हात जोडून डोळे मिटून बसले. चुन्तुही गणपतीसमोर हात जोडून बसला पण त्याने डोळे न मिटाता तो आजोबा अजुन काय काय करतात ते बघत होता. आजोबा डोळे मिटून दोन क्षण बसले आणि त्यांनी मग प्रार्थना केली -
आजोबा - '' देवा मला पाव ''
क्षणाचाही विलम्ब न लावता डोळे मिटून चिंटू म्हणाला - '' देवा मला खारी ''

0 टिप्पणी(ण्या):